अमित शहांनी घेतली सरसंघचालकांची भेट 

मुंबई – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. भाईंदरमधील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत झालेल्या या भेटीतील चर्चेचा तपशील समजू शकला नाही. सध्या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे.

याशिवाय, लोकसभेची पुढील निवडणूक अवघ्या सहा महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे शहांनी घेतलेल्या भागवत यांच्या भेटीचे महत्व वाढले आहे. सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येतील राम मंदिराबाबतची सुनावणी लांबणीवर टाकली आहे. त्यानंतर मंदिर उभारणीसाठी मोदी सरकारने कायदा बनवावा अशाप्रकारची मागणी संघ परिवाराने लावून धरली आहे. त्यामुळेही शहा आणि भागवत यांच्यातील भेट महत्वाची मानली जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)