नवी दिल्ली – भाजपा अध्यक्ष अमित शहा, भाजपनेते रविशंकर प्रसाद आणि डीएमके पक्षाच्या नेत्या कनिमोझी यांनी आपल्या राज्यसभेतील खासदारकीचा राजीनामा दिला आहे.
देशभरामध्ये नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये या तीनही नेत्यांनी जनतेतून विजय प्राप्त केल्याने आपल्या राज्यसभेतील खासदारकीचा राजीनामा दिला असून भाजपा अध्यक्ष अमित शहा गुजरातमधील गांधी नगर लोकसभा मतदारसंघातून, रविशंकर प्रसाद बिहारमधील पटना साहिब लोकसभा मतदारसंघातून तर कनिमोझी या तामिळनाडूतील थुतकुडी लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत.
BJP President Amit Shah, BJP leader Ravi Shankar Prasad & DMK Leader Kanimozhi resign as Rajya Sabha members. Shah, Prasad & Kanimozhi have been elected from the parliamentary constituencies of Gandhinagar, Gujarat and Patna Sahib, Bihar and Thoothukudi, Tamil Nadu, respectively pic.twitter.com/Ie7JaktIzj
— ANI (@ANI) May 29, 2019