कोलकाता येथे अमित शहा यांना दाखवण्यात आले काळे झेंडे 

कोलकाता: भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे कोलकाता येथे आगमन झाले. ते येथे एका सभेला संबोधित करण्यासाठी आले आहेत. नेताजी सुभाषचंद्र बोस अंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे आगमन झाल्यावर युवक काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवत  विरोध दर्शवला.
युवक काँग्रेसचे कार्यकर्ते काळे झेंडे दाखवून थांबले नाहीत तर त्यापुढे जाऊन त्यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधी घोषणाही दिल्या. त्यांनी अमित शहा गाडीत बसल्यानंतर रस्ता देखील लावण्याचा प्रयन्त केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून त्यांना बाजूला केले आणि रस्ता मोकळा केला.
पश्चिम बंगालचे बीजेपी प्रेदेशाध्यक्ष कैलाश विजयवगिया आणि दिलीप घोष यांनी  अमित शहा यांचे कोलकाता येथे स्वागत केले.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)