मोदी समर्थनाच्या घोषणा देणाऱ्यांना अटक झाल्याने अमित शहांची राहुल गांधींवर टीका 

नवी दिल्ली – बंगलुरू येथील एका कार्यक्रमात तेथील युवकांनी पंतप्रधान मोदी यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्याने त्यांच्यापैकी काहींना अटक झाली आहे त्यावरून भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. देशाचे तुकडे करण्याची घोषणा करणाऱ्यांना ते अलिंगन देतात आणि मोदींच्या बाजूने घोषणा देणाऱ्यांना ते अटक करतात ही त्यांची अभिव्यक्ती स्वातंत्र्यांची व्याख्या आहे काय असा त्यांचा सवाल आहे. त्यांनी भारतातील युवकांना अटकेची कारवाई करून धमकावणे थांबवावे अशी सुचनाही शहा यांनी ट्विटरवर केली आहे.

राहुल गांधी यांच्या बंगलुरू येथील मान्यता टेक पार्क मधील कार्यक्रमाच्यावेळी काही युवकांनी मोदींच्या समर्थनाच्या घोषणा दिल्या होत्या. त्यावरून पोलिसांनी ही अटकेची कारवाई केली. राज्यातील कॉंग्रेस-जेडीएस आघाडी सरकारच्या राज्यात लोकशाहीची ही स्थिती आहे असा टोमणाही त्यांनी मारला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)