लखनौ – अखिलेश यादव, मायावती आणि कॉंग्रेसला एक मागास जातीचा व्यक्ती पंतप्रधान झालेला पाहावत नाही, अशी टीका भाजपध्यक्ष अमित शहा यांनी केली.
शहा म्हणाले की, कॉंग्रेस पक्ष, अखिलेश यादव आणि मायावती हे पंतप्रधान मोदींना नेहमीच शिव्या घालतात. त्यांना कसली अडचण आहे. एक मागासजातीचा व्यक्ती पंतप्रधान झाला हे त्यांना सहनच होत नाही. ते मोदींना नेहमी हिटलर, मुसोलिनी, खुनी आणि दहशतवादी म्हणतात.
तसेच मायावती, अखिलेश आणि नेताजी म्हणतात की त्यांनी गरिबांसाठी काम केले. परंतु त्यांनी कधीच गरिबांसाठी काम केले नाही. मोदींनी गरिबांसाठी काम केले कारण ते एका गरीब कुटुंबातून आले आहेत. त्यामुळे लोकांना ते आवडतात. सपाचे जेव्हा राज्य होते तेव्हा त्यांनी विशिष्ट जातीसाठी काम केले. पण जेव्हा भाजपचे राज्य आले तेव्हा आम्ही कुणाचीही जातधर्म न विचारता सगळ्यांसाठी काम केल्याचे शहा यांनी सांगितले.