आमिरचा ‘फिरंगी भल्ला’ बनणार गुगल मॅपवरचा गाईड 

सध्या आपल्या आगामी ‘ठग्स ऑफ हिन्दोस्तान’ या चित्रपटाचे प्रमोशन करण्यात बॉलिवूडचा मिस्टर परफेक्‍शनिस्ट आमिर खान व्यस्त आहे. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असल्यामुळे आमिर खान या चित्रपटाचे प्रमोशन कुठेही कमी पडू नये यासाठी प्रयत्न करत आहे.

त्याची याचसाठी गुगल मॅपवर खास एन्ट्री होणार आहे. ‘ठग्स ऑफ हिन्दोस्तान’मध्ये आमिर ‘फिरंगी भल्ला’ हे पात्र साकारत आहे. आता हे पात्र गुगल मॅपवर रस्ते दाखविण्यात मदत करणार आहे. गुगल मॅप्ससोबत ही योजना चित्रपटाच्या टीमने आखली आहे. हा चित्रपटाच्या मार्केटिंगचाच भाग असल्यामुळे आजपासून आमिरचे हे पात्र प्रत्येकाच्या गुगल मॅपवर दिसणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गुगल मॅपचे वापरकर्ते त्यांच्या ऍन्ड्राईड किंवा आयओएस स्मार्टफोनवर या फिरंगीसोबत प्रवास करण्याचा पर्याय निवडू शकतात. या सगळ्यात ‘फिरंगी भल्ला’ हा गाढवावार बसून वापरकर्त्यांसोबत प्रवास करताना दिसणार आहे. ही कल्पना आजच्या मोबाईल गॅजेटच्या जगात “ठग्ज…’ला लोकप्रिय करण्यासाठी खूप उपयोगी ठरेल असा अंदाज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)