आमीरच्या मुलीला मिळाला बॉयफ्रेंड

आमीर खान एरवी तर अगदी लाईम लाईटपासून दूर असतो. वैयक्‍तिक आयुष्यातील कोणत्याही गोष्टींचे गॉसिप होऊ न देण्याकडेही त्याचा कटाक्ष असतो. त्याची मुलगी इरा देखील तशीच लाईम लाईटपासून दूर राहणेच पसंत करते. मात्र अलीकडे तिचे काही पर्सनल फोटो सोशल मीडियावर व्हायरल व्हायला लागले आहेत. त्यामुळे तिचे अफेअर सुरू झाले की काय, अशी खमंग चर्चा सुरू झाली आहे. अलिकडेच इराने इन्स्टाग्रामवर आपल्या जवळच्या मित्राबरोबरचे फोटो शेअर केले होते. तिने हे फोटो कॅलिफोर्नियात सांता बार्बरा इथून शेअर केले होते.

या फोटोमधील मुलगा आणि इरा यांचे रिलेशन खूपच जवळचे आहे, असे या फोटोंवरून दिसून येते आहे. दोघेही अगदी एकमेकांना बिलगून बसलेले आणि खास गोष्टी शेअर करताना दिसत आहेत. स्वाभाविकच आमीर कन्येच्या या मित्राविषयीची उत्सुकता चालवली जाणे स्वाभाविकच आहे. काही जणांनी या फोटो खाली कमेंटमध्ये तशी शंकाही उपस्थित केली.

या मुलाचे नाव आहे, मिशल कृपलानी. मिशल मूळचा मुंबईचा आहे आणि तो व्यवसायाने कंपोझर आहे. इराला देखील संगीतामध्ये विशेष रुची आहे.

संगीतामध्ये आपली क्रिएटिव्हीटी कायम राखण्यासाठी तसेच प्रॉडक्‍शन, मॅनेजमेंट आदीचा अनुभव घेण्यासाठी म्युझिक डायरेक्‍टर राम संपतच्या टीमबरोबर काम करायचे होते. तिला सिनेमात अधिक रस आहे की म्युझिकमध्ये अधिक रस आहे, याची आमीरलाही स्पष्ट कल्पना नाही. आता जर कंपोझरबरोबर तिचे सूर जुळत असतील, तर सहाजिकच तिचा म्युझिकमधील इंटरेस्ट जास्त चांगला असणार. इरा ही आमीरची पहिली पत्नी रिना दत्ताची मुलगी आहे. रिना दत्तापासून आमीरला जुनैद आणि इरा अशी दोन मुले आहेत. 2005 मध्ये आमीर आणि किरण राव यांचा विवाह झाला आणि त्यांना आझाद नावाचा मुलगा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)