“ठग्ज ऑफ हिंदुस्थान…’ फ्लॉप झाल्यावर आमिर बनला कार्टुन 

मिस्टर परफेक्‍शनिस्ट आमिर खानचा “ठग्ज ऑफ हिंदुस्थान’ फारच वाईट पद्धतीने फ्लॉप ठरला आहे. त्यानंतर आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव चक्क कार्टुन बनले आहेत. सिनेमा फ्लॉप झाल्यावर खरे तर दुःख व्हायला पाहिजे. पण कार्टुन बनण्यामागे “ठग्ज…’चे अपयश सेलिब्रेट करण्याचा हेतू होता असे मात्र नाही. कार्टुन बनण्यामागचे कारण आमिर आणि किरणच्या मुलाचा वाढदिवस हे कारण होते. आमिरने अलिकडेच इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

त्यात तो स्वतः, पत्नी किरण राव आणि मुलगा आझाद हे तिघेही कॉमिक बुक “एस्टेरिक्‍स’मधील काही व्यक्तिरेखांच्या रुपात दिसत आहेत. निमित्त होते आझादच्या वाढदिवसानिमित्त आयोजित एका थीम पार्टीचे. या पार्टीमध्ये आमिर खान बोबेलिक्‍स या पात्राच्या वेशभुषेमध्ये सहभागी झाला होता. तर किरण – गेटाफिक्‍स आणि आझाद -एस्टेरिक्‍सच्या गेट अपमध्ये होते. आमिर खानने आपल्या कुत्र्यालाही एका व्यक्तिरेखेच्या गेट अपमध्ये सजवले होते. “ठग्ज ऑफ हिंदुस्थान…’ सारखा बिगबजेट सिनेमा फ्लॉप झाल्यानंतरही आमिरने त्याचा आपल्या पर्सनल लाईफवर काहीही परिणाम होऊ दिलेला नाही, हेच यामुळे लक्षात आले.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
4 :thumbsup: Thumbs up
1 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)