बलात्कार केस प्रकरणी ‘ख्रिस्तियानो रोनाल्डो’ अडचणीत

file photo

तुरिन (इटली) – विश्वातील सर्वात प्रसिध्द आणि पोर्तुगालचा स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो बलात्कार केल्याच्या  आरोपा प्रकरणी मोठ्या विवादात सापडला आहे. एका अमेरिकी महिलेने शुक्रवारी सार्वजनिक रित्या रोनाल्डो वर तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप लावला आहे. मात्र रोनाल्डोने हे आरोप फेटाळून लावले असून केवळ प्रसिध्दीसाठी ती महिला आरोप करत आहे असे त्याने म्हटलं आहे.

दरम्यान अमेरिकेतील महिला कैथरीन मेयोर्गाने रोनाल्डाे वर 2009 मध्ये तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप लावला आहे. त्यानंतर तिने मागील शुक्रवारी बलत्काराची केस दाखल दाखल केली आहे.

-Ads-

जर्मनीतील मॅगझीन डेर स्पीगल ने सर्वात आधी 2017 मध्ये हा मुद्दा उठवला होता. मॅगझीनमध्ये लिहले होते की, कैथरीन मेयोर्गाने दावा केला होता की, 33 वर्षीय खेळाडू रोनाल्डो ने लास वेगासमधील एका हाॅटेलमधील खोलीत तिच्यासोबत गैरवर्तन केले होते. या घटनेनंतर लगेच लास वेगास येथील पोलीस स्टेशनमध्ये मेयोर्गाने यासंबंधी केस दाखल केली होती.

मेयोर्गाचे आरोप आहेत की, यानंतर 2010 मध्ये या प्रकरणी न्यायालयाच्या बाहेर तिने रोनाल्डोसोबत तडजोड केली होती. हे प्रकरण जनतेसमोर न आणण्याच्या अटीवर 375,000 डाॅलर रक्कम तिला देण्यात आली होती. मात्र आता तिचे वकील ही तडजोड रद्द करण्याची मागणी करत आहे.

दुसरीकडे रोनाल्डो याने हे आरोप फेटाळून लावले आहेत. रोनाल्डोने म्हटलं आहे की, मेयोर्गा त्याचे नाव घेऊन स्वत: प्रसिध्दी मिळवू पाहत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)