अमेरिकेत न्यायाधीशपदी भारतीय वंशाच्या निओमी राव

वॉशिंग्टन – अमेरिकेतील “डीसी सर्किट कोर्ट ऑफ अपील्स’ न्यायालयातील न्यायाधीशपदी ज्येष्ठ भारतीय-अमेरिकन वकील निओमी राव यांची नियुक्ती करण्यात आली असून सिनेटने त्याला नुकतीच मंजुरी दिली आहे. लैंगिक अत्याचारा संदर्भातील भूमिकेबद्दल वादात सापडल्यानंतर त्यांची या पदी नियुक्ती करण्यास तीव्र विरोध झाला होता. मात्र सिनेटने 53-46 अशा बहुमताने त्यांच्या मंजुरीवर शिक्कामोर्तब केला.

राव या सध्या व्यवस्थापन आणि अर्थसंकल्प विभागात ऑफिस ऑफ इन्फोर्मेशन अँड रेग्युलेटरी अफेअर्समध्ये प्रशासक आहेत. लैंगिक अत्याचार आणि अल्पसंख्यकांबद्दलच्या त्यांच्या भूमिकेमुळे सिनेटमधील विरोधी डेमोक्रॅटिक पक्षासह रिपब्लिकन पक्षाच्या काही सदस्यांनीही निओमी राव यांना विरोध केला होता. मानवाधिकारांसाठी कार्य करणाऱ्या गटांनीही त्यांच्याविरोधात मोहीम चालवली होती. मात्र, सिनेटमधील मंजुरीने त्यांचा न्यायाधीशपदाचा मार्ग मोकळा झाला. या पदाची शपथ घेणाऱ्या त्या केवळ दुसऱ्या भारतीय-अमेरिकन ठरणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)