निशस्त्रीकरणाबाबत किम जोंग यांच्याशी झाली विधायक चर्चा

अमेरिकन परराष्ट्र मंत्र्यांचा दावा

सेऊल: अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पेओ यांनी रविवारी उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंग यांच्याशी निशस्त्रीकरणाबाबत चर्चा केली. या चर्चेत बरीच प्रगती झाल्याची माहिती पॉम्पेओ यांनी दिली आहे. तथापी अनेक प्रश्‍न अजून प्रलंबीत असून डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग यांच्यातील दुसऱ्या बैंठकीत त्यावर तोडगा निघू शकतो असे त्यांनी म्हटले आहे. रविवारी त्यांची किम जोंग यांच्याशी चर्चा झाल्यानंतर पॉम्पेओ आज सेऊल मध्ये पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे. त्यात इतक्‍या झटपट निष्कर्ष निघतील अशी खात्री बाळगता येत नाही. पण आमची रविवारी झालेली चर्चा अत्यंत विधायक स्वरूपाची झाली असे त्यांनी नमूद केले.

-Ads-

उत्तर कोरिया अमेरिकेच्या सरकारशी निशस्त्रीकरणाबाबत चर्चेला तयार झाला आहे हीच एक महत्वाची घडामोड असली तरी त्यांच्याकडील अण्वस्त्रे त्यांनी नष्ट केली पाहिजेत असा आग्रह अमेरिकेने त्यांच्याकडे धरला आहे. त्याविषयी अजून किम जोंग यांनी स्पष्टपणे होकार दर्शवलेला नाही. यापुढे नव्याने अण्वस्त्र निर्मीती करायची नाही हा प्रस्ताव आम्हाला मान्य होऊ शकतो पण सध्या आहेत ती अण्वस्त्रे नष्ट करण्याच्या प्रस्तावावर मात्र निर्णय घेण्यास आम्हाला विलंब लागू शकतो असे त्यांनी सूचित केले आहे.

उत्तर कोरियावर सध्या जगाचे आर्थिक निर्बंध आहेत. ते उठवण्यासाठी तो देश प्रयत्नशील आहे. कारण त्यांची आर्थिक आणि एकूणच स्थिती अत्यंत खराब झाली असून लोकांना दारिद्य्र आणि भूकबळीतून वाचावायचे असेल तर आर्थिक निर्बंध दूर करणे हाच त्यांच्यापुढील एकमेव पर्याय आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)