आता चंद्रावर राहणार अमेरिकन अंतराळवीर 

वॉशिंग्टन – अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था “नासा’ने 2028मध्ये अंतराळ यात्रींना चंद्रावर पाठवण्याची योजना तयार केली आहे. या योजनेमध्ये एक नाविन्यपूर्ण उपक्रम नासाने हाती घेतला असून त्यात अमेरिकेचे अंतराळवीर 7 दिवस चंद्रावर राहणार आहेत.

“नासा’चे प्रमुख जीम ब्राईडेंस्टाईन यांनी सांगितले की, 2028पूर्वी 2024 व 2026मध्ये चाचणीसाठी मानवरहित चांद्रमोहिमा आखल्या जाणार आहेत. यावेळी आम्ही चंद्रावर आपल्या देशाचा ध्वज फडकावण्यासाठी अथवा पायांचे ठसे सोडण्यासाठी नव्हे; तर तेथे वास्तव्य करण्यासाठी जाणार आहोत. या कारणामुळेच आम्ही ही योजना अपोलोपेक्षा वेगळ्या पद्धतीने तयार केली आहे. “अपोलो-11′ या मिशनअंतर्गत 1969मध्ये नील आर्मस्ट्रॉंग चंद्रावर उतरणारे पहिले व्यक्‍ती ठरले होते. या अत्यंत यशस्वी मोहिमेनंतर अमेरिका सुमारे 60 वर्षांनंतर दुसऱ्यांदा पृथ्वीच्या या उपग्रहावर अंतराळयात्रींना पाठवण्याची योजना अंमलात आणण्याच्या प्रयत्नात आहे.

नव्या मिशनसाठी उपकरण व अंतराळ यान विकसित करण्यासाठी यावेळी कमर्शियल कंपन्यांची मदत घेण्यात येत आहे. नासाने या कंपन्यांना चंद्रावर उतरण्यासाठी एक अंतराळ यान, एका यानातून दुसऱ्या यानात जाण्यासाठी वाहन व इंधन भरणारी प्रणाली विकसित करण्यासंबंधीचा प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे. या संभाव्य चांद्रमोहिमेसाठी निवडण्यात आलेल्या कंपन्यांना आपल्या प्रस्तावावर काम करण्यासाठी नासा 90 लाख डॉलर्स देणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)