चीनला शांत करण्याचा अमेरिकेकडून प्रयत्न

अमेरिकेचे नौदल प्रमुख जाणार चीन भेटीवर

वॉशिंग्टन: अमेरिकेचे नौदल प्रमुख ऍडमिरल जॉन रिचर्डसन हे उद्यापासून चार दिवसांच्या चीन दौऱ्यावर जात आहेत. चीन आणि अमेरिके मध्ये निर्माण झालेले लष्करी तणाव आणि व्यापार युद्धामुळे निर्माण झालेली अस्वस्थता कमी करण्याचा प्रयत्न अमेरिकेकडून सुरू करण्यात आला असून त्याच उद्देशाने नौदल प्रमुखांची ही चीन भेट आयोजित करण्यात आली आहे.

गैरसमजातून दोन्ही देशांमध्ये विनाकारण मोठा तणाव निर्माण होणे टाळले पाहिजे यासाठीच आपण तेथे प्रयत्न करणार आहोत असे रिचर्डसन यांनी सांगितले. ते म्हणाले की प्रामाणिकपणाने आणि खुलेपणाने दोन्ही देशांमध्ये चर्चा झाली तर अनेक प्रश्‍न सुटू शकतात आणि तंटा टळू शकतो त्यासाठी चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत असे त्यांनी सांगितले. चीनचे नौदल प्रमुख आणि अमेरिकन नौदल प्रमुखांमध्ये या आधी तीनवेळा व्हिडीओ कॉन्फरसिंग द्वारे चर्चा झाली आहे ही प्रक्रिया पुढे नेण्यासाठी आता दोन्ही देशांच्या नौदल प्रमुखांमध्ये ही चर्चा होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)