अमेरिकेने हाफिजच्या संघटनांवरून पाकिस्तानला फटकारले 

वॉशिंग्टन – लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा संस्थापक हाफिज सईद याच्या इतर संघटनांवरून अमेरिकेने पाकिस्तानला स्पष्ट शब्दांत फटकारले आहे. त्या संघटनांवर बंदी घालण्यासाठी तातडीने कायदा करावा, असे अमेरिकेने बजावले आहे.

मुंबईतील महाभयंकर दहशतवादी हल्ल्यांचा (26/11) सूत्रधार असणारा सईद समाजसेवेचे ढोंग करण्यासाठी जमात-उद्‌-दावा (जेयूडी) आणि फलाह-ए-इन्सानियत फाऊंडेशन (एफआयएफ) यांसारख्या संघटना, संस्था चालवतो. पाकिस्तानमध्ये बंदी घालण्यात आलेल्या संघटनांच्या यादीतून जेयूडी आणि एफआयएफ बाहेर पडल्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

संयुक्त राष्ट्रांच्या ठरावाला अनुसरून पाकिस्तानने काढलेल्या अध्यादेशामुळे जेयूडी आणि एफआयएफचा त्या यादीत समावेश झाला होता. मात्र, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारने मुदतवाढ न देण्याचा नाकर्तेपणा केल्याने तो अध्यादेश मोडीत निघाला.

त्यामुळे जेयूडी आणि एफआयएफला मोकळे रान मिळाले. त्याची गंभीर दखल अमेरिकेने घेतली आहे. सईदच्या संघटनांवर बंदी नसणे ही बाब पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी लढ्याशी असलेल्या वचनबद्धतेच्या विरोधात जाणारी असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. तसेच, त्या संघटनांविरोधात पाऊले उचलण्याची सूचना पाकिस्तानला केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)