अमेरिकेने हुआवेईला ब्लॅक लीस्टमध्ये टाकले

वॉशिंग्टन – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील कंपन्यांना विदेशी टेलिकॉम उपकरणे वापरण्यास बंदी केली आहे. राष्ट्रीय सुरक्षेचा विचार करून ही बंदी घालण्यात आली आहे. चीनमधील आघाडीची टेलिकॉम कंपनी हुआवेईला अमेरिकेतील नेटवर्कमधून बाद करण्याच्या हेतूने हे पाऊल उचलण्यात आले आहे. चीनबरोबर व्यापारी युद्ध भडकलेले असतानाच अमेरिकेने हे मोठे पाऊल उचलले आहे.

अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी स्वाक्षरी केलेल्या कार्यकारी आदेशामध्ये कोणताही देश अथवा कंपनीच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. मात्र अधिकाऱ्यांनी यापूर्वी हुआवेईचा उल्लेख धोका असा केला होता. जगातील सर्वात मोठ्या टेलिकम्युनिकेशन कंपनीकडून 5 जी नेटवर्कसाठी लागणारी उपकरणे वापरणे टाळावे, अशी सूचना यापूर्वीच अमेरिकेतील कंपन्यांना देण्यात आली आहे.

या सूचनेपाठोपाठ अमेरिकेच्या “हुआवेई टेक्‍नोलॉजीज कंपनी लिमिटेड’ या कंपनीला आणि अन्य संबंधित उपकंपन्यांना “ब्युरो ऑफ इंडस्ट्री ऍन्ड सिक्‍युरिटी’ने प्रवेश रोखण्याच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षिततेबाबत किंवा विदेश धोरणाच्या विपरीत उद्योग हुआवेई कंपनीकडून केले जात असल्याचा आरोप वाणिज्य विभागाने केला आहे.

याच कारणासाठी प्रवेश रोखलेल्या कंपनीच्या प्रतिनिधींना अमेरिकेतील तंत्रज्ञान विकणे किंवा हस्तांतरित करण्यासही बंदी घातली गेली आहे. तसे करणाऱ्या कंपनीचा परवानाही रद्द करण्याचा इशारा “ब्युरो ऑफ इंडस्ट्री ऍन्ड सिक्‍युरिटी’ने दिला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)