रशियावरच्या निर्बंधांबाबत अमेरिकेची सौम्य भूमिका 

अवलंबून राहणे भारतासारख्या देशांनी थांबवावे 
वॉशिंग्टन: रशियाकडून शस्त्रास्त्रे खरेदी करण्यावर अमेरिकेने सौम्य धोरण स्वीकारत आपल्याकडून लावण्यात येणार निर्बंध हे वास्तविक रूपात रशियाला दंडित करण्यासाठी असल्याचे म्हटले आहे. रशियाकडून “एस-400′ क्षेपणास्त्रे खरेदीबाबतचा करार झाल्यानंतर काही तासाच्या आत अमेरिकन दुतावासातून पहिली प्रतिक्रिया समोर आली. अमेरिकेच्या निर्बंधाचा हेतू हा भागीदार किंवा सहकारी देशांच्या लष्करी क्षमतांचे नुकसान करण्याचा नाही, असे अमेरिकेच्या दुतावासाने म्हटले आहे.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर वार्षिक द्विपक्षीय परिषदेसाठी भारतात आले असताना शुक्रवारी हा करार करण्यात आला. रशियावर निर्बंध लादण्यासंदर्भात अमेरिकेकडून सावध प्रतिक्रिया देण्यात आली आहे. भारताला “एस- 400′ क्षेपणास्त्र मिळाल्यास शत्रुच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांना सक्षमपणे उत्तर देणे भारतीय लष्करी दलांना शक्‍य होणार आहे.
करार झाल्यानंतर अमेरिकेकडून तीव्र प्रतिक्रिया येईल अशी अपेक्षा करण्यात आली होती. परंतु, अमेरिकन दुतावासाने संयमित प्रतिक्रिया दिली. भारत आणि रशिया यांच्यात शुक्रवारी अवकाश सहकार्याशिवाय 8 मोठे करार झाले. दरम्यान, अमेरिकेने सांभाळून प्रतिक्रिया देत म्हटले की, रशियाविरोधात निर्बंध घालण्याचा उद्देश हा आपल्या सहकाऱ्यांच्या सैन्य क्षमतांचे नुकसान करण्याचा नाही.
अमेरिकन दुतावासाच्या प्रवक्त्‌याने म्हटले की, अमेरिकेचा कायदा “सीएएटीएसए’चे कलम 231 वर एका व्यवहाराच्या आधारावर विचार होईल. सीएएटीएसए लागू करण्याचा आमचा हेतू हा रशियाच्या घातक व्यवहाराला दंडित करण्याचा आहे. यामध्ये रशियाच्या संरक्षण क्षेत्राचा निधी रोखण्याचाही समावेश आहे.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)