मंचर/डिंभे -आंबेगाव तालुक्याच्या तहसीलदार सुषमा पैकेकरी व लिपीक दिनकर लाडके यांनी कुरवंडी येथील शेतकरी व डबर वाहतूक करणारा व्यावसायिक यांच्या तक्रारीवरून 1 लाख रुपयांची लाच घेताना घोडेगाव (ता. आंबेगाव) येथे रंगेहात पकडले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती लाच लुचपत प्रतिबंध विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक दिलीप बोरस्ते यांनी दिली.
घोडेगाव येथे तहसील कार्यालयाच्या आवारात प्रांतधिकारी संजय पाटील यांनी कार्यवाही करून डबर वाहतूक करणारी ट्रक आणून ठेवली होती. तहसीलदार पैकेकरी यांनी डबर वाहतूक करणाऱ्या ट्रकवर 2 लाख 41 हजार 50 रूपये दंड आकारणार असल्याचे तक्रारदार यांना सांगितले. तक्रारदार व तहसीलदार पैकेकरी यांच्यात झालेल्या तडजोडीनुसार 46 हजार रूपये दंड व 1 लाख रूपये लाच देण्याचे ठरले. तक्रारदार यांनी पुणे येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार आज सायंकाळी सहा वाजता तहसील कार्यालयामध्ये 1 लाख रुपयांची रोख लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले