आंबेनळी दुर्घटना – अपघाती बसचालकाचा शोध लागण्याची शक्यता कमीच

मुंबई – पोलादपूर ते महाबळेश्‍वरदरम्यान असलेल्या आंबेनळी घाटरस्त्यावरून बस दरीत कोसळून 29 जणांना प्राण गमवावे लागले. ही बस 6 आॅक्टोबर रोजी बाहेर काढण्यात आली. मात्र ज्या उद्देशासाठी बस बाहेर काढण्यात आली तो उद्देश पूर्ण होऊ शकला नाही.

आंबेनळी अपघाताच्यावेळी बस कोण चालवत होते हे अजूनही स्पष्ट झाले नव्हते. त्यामुळे ही बस दरीतून काढण्यात आली. त्यानंतर तपास केला असता बसच्या स्टेरींग आणि गिअरवर कुणाचेही ठसे सापडले नाहीत. साहजिकच 2 महिन्यानंतर हाताचे ठसे मिळतील ही शक्यता कमीच होती. पण घटनेच्या तपासासाठी हा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र हा प्रयत्न अयशस्वी ठरला.

-Ads-

दरम्यान या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांनी सखोल चौकशीची मागणी केली होती. या अपघात बचावलेले प्रकाश सावंत देसाई यांच्यावर नातेवाईकांनी संशय व्यक्त केला होता. मात्र अखेर बस बाहेर काढूनही त्यावर हाताचे ठसे न सापडल्याने अपघाताच्या वेळी बस कोण चालवत होतं हे गूढ अद्यापही कायम आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
15 :thumbsup: Thumbs up
6 :heart: Love
17 :joy: Joy
3 :heart_eyes: Awesome
8 :blush: Great
50 :cry: Sad
4 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)