आंबेडकरांच्या नातवाकडूनच राज्यघटनेचा खून करण्याचा प्रयत्न 

पंढरपूरच्या प्रचार सभेत सुशीलकुमार शिंदे यांचा प्रकाश आंबेडकर यांच्यावर सनसनाटी आरोप

सोलापूर – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवाकडूनच भारतीय राज्यघटनेचा खून करण्याचा प्रयत्न होत आहे, असा सनसनाटी आरोप कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे यांनी केला आहे. धर्माच्या नावावर दंगे घडवून आणणाऱ्या एमआयएमसोबत निवडणूकीत युती करुन देशाची राज्यघटना लिहिणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकरच राज्यघटनेचा खून करण्याचा प्रयत्न करीत आहे. आंबेडकरी जनतेचे हे दुर्दैव असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने पंढरपुरात संत तनपुरे महाराज मठात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कार्यकर्त्याचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात निवडणूक संदर्भात मार्गदर्शन करताना शिंदे यांनी बहुजन वंचित विकास आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकरांवर चौफेर टिका केली. एक उमेदवार धर्माच्या नावावर साधुगिरी करु लागले आहेत. तर दुसरे उमेदवार जातीयवादी एमआयएमसारख्या पक्षाला सोबत घेवून निवडणूका लढवत असल्याचे त्यांनी म्हटले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील सर्वधर्मसमभाव टिकून राहण्यासाठी सलग तीन वर्षे अभ्यास करुन भारतीय राज्यघटना लिहीली. त्याच डॉ. बाबासाहेबांचे नातू आज देशात जातीच्या नावावर अहंकार माजवणाऱ्या आणि अत्याचार करणाऱ्या एमआयएमसारख्या कट्टर जातीयवादी पक्षाला सोबत घेवून धर्माच्या आधारावर मत मागत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातूच आता राज्यघटनेच्या मुळावर उठल्याची टिकाही शिंदे यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)