लाखों भीमसैनिकांच्या घोषणांनी कोरेगाव भीमा दुमदुमले

ऐतिहासिक विजयरणस्तंभास मानवंदना

कोरेगाव भीमा, वढु बुद्रुक येथे गर्दीचा उच्चांक

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कोरेगाव भीमा: शिरूर तालुक्‍यातील कोरेगाव भीमा (पेरणे फाटा) येथील विजयरणस्तंभ येथे राज्यभरातून आलेल्या आंबेडकर चळवळीतील सुमोर दहा लाख कार्यकर्त्यांनी मानवंदना दिली. यावेळी परिसरात फुलांची आकर्षक सजावट, रात्री फटाक्‍यांची आतषबाजी, सामूहिक बुद्ध वंदना आदी कार्यक्रमांत सहभागी होत राज्यभरातील भीमसैनिकांनी प्रचंड गर्दी केली होती. दोनशे वर्षांची परंपरा असलेल्या या सोहळ्यात “जय भीम’ “एकच साहेब, बाबासाहेब’ या गगनभेदी घोषणांनी परिसर दुमदुमला. यावेळी महसूल आणि पोलीस दलाचे नियोजन अपुरे पडल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली.

विजयस्तंभास मानवंदना दिल्यानंतर लाखों भीमसैनिकांनी वढु बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज व गोविंद गोपाळ यांच्या समाधीस्थळी दर्शनासाठी गर्दी होती. यावेळी परिसर भीमसागरमय झाला होता. दरम्यान, भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी राज्य सरकारवर सडकून टीका केली. तसेच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी विजयस्तंभ परिसराला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा, अशी मागणी आम्ही केंद्र आणि राज्य सरकारकडे करणार आहे. तसेच शंभर कोटींचा आराखडा तयार केला असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

गेल्यावर्षी कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयरण स्तंभास अभिवादन कार्यक्रमावेळी उसळलेल्या दंगलीच्या जखमा ताजा असताना महसूल आणि पोलीस दलाचे गेल्या तीन महिन्यांपासून नियोजन, सुविधा आदीबाबत बैठक पार पडल्या. त्यानंतर जिल्हाधिकारी नवल किशोर राम, कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील, ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी झोकून देऊन काम केले होते. सोमवार (दि.31) रात्री बारापासून भीमसैनिकांची गर्दी होऊ लागली. त्यानंतर सकाळी भीमसैनिकांच्या गर्दीने उच्चांक गाठला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)