अल्झायमर (स्मृतिभ्रंश) भाग-2

अल्झायमर (स्मृतिभ्रंश) भाग-1

-डाॅ. चंद्रशेखर मेश्रम

दरवर्षी नोव्हेंबर हा महिना अल्झायमर प्रतिबंधक जनजागृती महिना म्हणून जगभर साजरा केला जातो. अल्झायमर साधारणपणे 60 वर्षे वयानंतर दिसून येतो. मनावर जास्त ताण आला, तर कमी वयातही आठवण राहात नाही. कारण मन इकडे तिकडे भटकत असतं, हा ही डिमेन्शियाचा प्रकार नाही. डिमेन्शियावर सध्या औषध नाही.

महिलांना स्मृतिभ्रंशाची जोखीम दीडपट

बाळंतपणा, मासिकपाळी, हल्लीचा ताणतणाव, स्पर्धा यासारख्या गोष्टींमुळे महिलांमध्येही ताण वाढत आहे. उतारवयात त्याचे परिणाम दिसू लागतात. स्मृतिभ्रंश हा त्यातीलच एक आजार आहे. यात अगदी क्षुल्लक गोष्टी देखील लक्षात राहात नाहीत. पुरुषांच्या तुलनेत महिलांना या स्मृतिभ्रंशाची जोखीम दीडपट अधिक असते.

स्मृती आणि मेंदूचा अत्यंत जवळचा संबंध आहे. विज्ञान युगातल्या गोळ्या-औषधांनी म्हातारपण लांबविले असली तरी आजार मात्र कायम आहेत. स्मृतिभ्रंश (अल्झायमर) हा आजार त्यापैकीच एक बेजार करणारा आजार आहे. सरासरी लोकसंख्येच्या 12 टक्के व्यक्ती वयाची साठी ओलांडलेल्या आहेत. त्यापैकी तीनटक्के म्हणजे, 40 लाख ज्येष्ठ नागरिक या आजाराने त्रस्त आहेत.

जगभर 2030 पर्यंत हा आकडा दुपटीने वाढेल, असे संकेत जागतिक आरोग्य संघटनेने दिले आहेत. राज्यात 2006 मध्ये 2 लाख 7 हजार ज्येष्ठ नागरिक अल्झायमरने त्रस्त होते. यात 21 लाख स्त्रिया आणि 15 लाख पुरुष, असे हे प्रमाण आहे. ज्यांनी वयाची साधारणपणे पन्नाशी गाठली आहे आणि ज्यांना स्मरणशक्तीत बदल जाणवू लागला असेल, अशा रुग्णांनी मानसोपचार अथवा मेंदूविकार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

अल्झायमर हा स्मृतिभ्रंशाचा आजार आहे. यामुळे स्वभावात बदल होतो. त्याचा परिणाम वर्तणुकीवर होतो. निद्रानाश आणि भूक न लागणे, असे प्रकार घडतात. नातेवाइकांची ओळख विसरणे, रस्ता चुकणे, चिडचिड आदी गोष्टी घडतात. कधी कधी यामुळे ते हिंसकही होऊ शकतात. कामभावनेवरील नियंत्रण सुटते. मेंदूतील स्मृती केंद्रावर ऍम्लॉइड प्रोटिनच्या हल्ल्याने अल्झायमर होतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)