#IPL 2019 : अल्झारी जोसेफचा मुंबई इंडियन्सच्या संघात समावेश

मुंबई -आयपीएलच्या बाराव्या मोसमात मुंबई इंडियन्सच्या अभियानाची सुरुवात पराभवाने झाली आहे. स्पर्धेत अपेक्षित सुरुवात झाली नसतानाच प्रमुख खेळाडूंना झालेल्या दुखापतींमुळेही मुंबईचा संघ त्रस्त झाला आहे. दरम्यान, दुखापतग्रस्त झालेला वेगवाग गोलंदाज ऍडम मिलने याच्याजागी बदली खेळाडू म्हणून वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफ याचा मुंबई इंडियन्सच्या संघात समावेश करण्यात आला आहे.

दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झालेल्या सलामीच्या लढतीदरम्यान मुंबईचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराह याला दुखापत झाली होती. दुखापतीमुळे बुमराहला काही सामने मुकावे लागण्याची शक्‍यता आहे. तसेच मुंबईचा अन्य एक वेगवान गोलंदाज ऍडम मिलने हासुद्धा जखमी झाल्यामुळे या स्पर्धेत खेळू शकणार नाही. त्यामुळे त्याच्या जागी बदली खेळाडू म्हणून वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफ याचा मुंबईच्या संघात समावेश करण्यात आला आहे. अशी माहिती मुंबई इंडियन्सच्या अधिकृत ट्‌विटर अकाऊंट वरून दिली गेली आहे.

गेल्या महिन्यात झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत जोसेफने भेदक गोलंदाजीचे प्रदर्शन केले होते. दरम्यान, जोसेफच्या समावेशामुळे मुंबईच्या वेगवान गोलंदाजीची धार वाढणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)