पाकिस्तान विरुद्ध खेळणे नेहमी रोमांचकारी – रोहित शर्मा

पत्रकार परिषदेतही रोहितची फटकेबाजी  

दुबई: आशिया चषक स्पर्धेला आजपासून युएईमध्ये सुरुवात होता आहे. भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश या प्रमुख संघांमध्येच खरी स्पर्धा रंगणार आहे. या चार संघांव्यतिरिक्‍त या स्पर्धेत अफगाणिस्तान व हॉंगकॉंग या संघांचा समावेश करण्यात आला आहे. यातील हॉंगकॉंगच्या संघाला अद्याप एकदिवसीय संघाचा दर्जा मिळालेला नसून केवळ या मालिकेपुरता त्याला हा दर्जा देण्यात आलेला आहे.पहिला सामना १५ सप्टेंबर रोजी श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात होईल.

या स्पर्धेच्या पूर्व संध्येला काल पत्रकार परिषद झाली. त्यात सर्व सहा  संघाचे कर्णधार हजर होते. त्यावेळी भारतीचा प्रभारी काकर्णधार रोहित शर्माला प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी त्याने तो म्हणाला, भारत येथे खेळणार असल्याने आम्ही खुश आहोत. आमच्या संघातील काही प्रमुख खेळाडू येथे आलेले नाहीत तरी आम्हाला संघ म्हणून काई करायचे आहे ते माहिती आहे. मागील काही मर्यादित षटकांच्या मालिकांमध्ये आमच्या संघाची कामगिरी उत्तम राहिली असून या स्पर्धेतही आम्ही तयारीनीशी उतरत आहोत.

“एका वेळी एका सामन्यावर लक्ष केंद्रित करून खेळ करणे यावर आमचा भर राहील. या स्पर्धेतील अन्य संघदेखील तुल्यबळ आहेत. त्यांचेही लक्ष्य ही स्पर्धा जिंक्याचे असेल. त्यामुळे ही स्पर्धा खूप अटातटीची होईल.”

पाकिस्तान विषयी प्रश्न विचारल्यावर रोहित म्हणाला, पाकिस्तानचा संघ तगडा आहे.  मागील काही मालिकेतील त्याची कामगिरीही चांगली आहे. त्याच्या विरुद्ध खेळणे नेहमी रोमांचकारी असते. परंतु, ही स्पर्धा जिंकायची असेल तर अन्य संघावर देखील नजर ठेवावी लागेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)