अलोकनाथांवर बलात्काराचा आरोप

मुंबई: चित्रपट आणि टीव्ही शोसाठी कथा व सीन लेखनाचे काम करणाऱ्या प्रख्यात लेखिका विनीता नंदा यांनी ज्येष्ठ अभिनेते आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. एका फेसबुक पोस्ट मध्ये त्यांनी ही सारी कथा सविस्तरपणे लिहीली असून त्यात त्यांनी आलोकनाथ यांचे नाव थेट घेतलेले नाही पण एक संस्कारी अभिनेता म्हणून ज्या ज्येष्ठ अभिनेत्याला आज ओळखले जाते त्यानेच आपल्याला दारूत काही तरी मिसळून आपल्याला जवळपास बेशुद्ध केले व नंतर त्याने आपल्याला घरी सोडण्याच्या बहाण्याने बलात्कार केला असे त्यांनी या पोस्ट मध्ये म्हटले आहे. 

दरम्यान अभिनेते आलोकनाथ यांनी या प्रकरणी एका दूरचित्रवाणीवर भाष्य करताना या आरोपाला पुष्टीही दिली नाही किंवा त्याचा स्पष्ट इन्कारही केलेला नाहीं. त्यांनी या मुलाखतीत असे सांगितले की या आरोपाचा मी इन्कारही करीत नाही किंवा त्याला दुजोराही देत नाही. त्यांच्यावर (लेखिका विनीता नंदा) असा प्रसंग ओढवलेला असू शकतो पण तो मी नव्हे तर अन्य कोणीतरी केला असावा असे त्यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)