अभिनेता आलोकनाथने बलात्कार केल्याचा लेखिकेचा आरोप 

मुंबई: चित्रपट आणि टीव्ही शोसाठी कथा व सीन लेखनाचे काम करणाऱ्या प्रख्यात लेखिका विनीता नंदा यांनी ज्येष्ठ अभिनेते आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. एका फेसबुक पोस्ट मध्ये त्यांनी ही सारी कथा सविस्तरपणे लिहीली असून त्यात त्यांनी आलोकनाथ यांचे नाव थेट घेतलेले नाही पण एक संस्कारी अभिनेता म्हणून ज्या ज्येष्ठ अभिनेत्याला आज ओळखले जाते त्यानेच आपल्याला दारूत काही तरी मिसळून आपल्याला जवळपास बेशुद्ध केले व नंतर त्याने आपल्याला घरी सोडण्याच्या बहाण्याने बलात्कार केला असे त्यांनी या पोस्ट मध्ये म्हटले आहे. 

दरम्यान अभिनेते आलोकनाथ यांनी या प्रकरणी एका दूरचित्रवाणीवर भाष्य करताना या आरोपाला पुष्टीही दिली नाही किंवा त्याचा स्पष्ट इन्कारही केलेला नाहीं. त्यांनी या मुलाखतीत असे सांगितले की या आरोपाचा मी इन्कारही करीत नाही किंवा त्याला दुजोराही देत नाही. त्यांच्यावर (लेखिका विनीता नंदा) असा प्रसंग ओढवलेला असू शकतो पण तो मी नव्हे तर अन्य कोणीतरी केला असावा असे त्यांनी म्हटले आहे. आता ऐवीतेवी हे प्रकरण जाहीर झाले आहेच ते आता बरेच लांबवले जाईल आणि त्यावर खूप चर्चा होईल. पण मी मात्र त्यावर आता फार भाष्य करणार नाही असे त्यांनी या मुलाखतीत सांगितले. आता आपल्याला केवळ ती महिला काय म्हणते तेच सहानभुतीने ऐकावे लागेल कारण महिला कमकुवत असतात असेही विधान त्यांनी केले आहे. विनीता नंदा यांनी म्हटले आहे की माझ्या जो प्रसंग ओढवला त्याबद्दल मी दोन वेळा लिहून लोकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला पण त्यानंतर मला कामे मिळणेच बंद झाले. 

दरम्यान या प्रकरणी आलोकनाथ यांना नोटीस जारी केली जाईल आणि त्यांच्याकडून समाधानकारक खुलासा आला नाही तर त्यांना सध्याच्या सर्व चित्रीकरणाच्या कामातून काढून टाकले जाईल असा इशारा सिने ऍन्ड टीव्ही आर्टिस्ट असोशिएशनने दिला आहे. विनीता नंदा यांनी या प्रकरणी आमच्या संघटनेकडे लेखी तक्रार द्यावी असे आवाहनही या संघटनेने केले आहे. त्यांना पुर्ण सहकार्य करण्याची ग्वाहीही संघटनेने दिली आहे. 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)