अलोक वर्मांचे भविष्य आज ठरणार; मोदींच्या अध्यक्षतेखालील समितीची आज रात्री बैठक

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीची सीबीआय संचालक आलोक वर्मा यांच्या संचालक पदाच्या भविष्याबाबत निर्णय घेण्यासाठी आज रात्री बैठक आयोजित करण्यात आली आहे.

तत्पूर्वी काल सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारचा सीबीआय संचालक आलोक वर्मा यांच्या उचलबांगडीचा निर्णय रद्दबाद ठरवत अलोक वर्मा यांची संचालक पदावर फेरनिवड केली होती. तसेच अलोक वर्मा यांच्या बाबतीतील पुढील निर्णय तातडीने घेण्याचे आदेश देखील पंतप्रधान यांच्या नेतृत्वाखालील समितीला दिले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याबाबत पंतप्रधान कार्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या समितीची बैठक आज रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवास्थानी होणार आहे.

काय आहे न्यायालयाचा आदेश?

न्यायालयाने अलोक वर्मा यांच्या बाबतीतील पुढील निर्णय तातडीने घेण्याचे आदेश पंतप्रधान यांच्या नेतृत्वाखालील समितीला दिले होते. या उच्चस्तरीय समितीत पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्ष नेते आणि सरन्यायाधिश यांचाही समावेश आहे. वर्मा यांच्या वरील आरोपांची केंद्रीय दक्षता आयोगाकडून चौकशी सुरू असून त्या समितीच्या निष्कर्षाच्या आधारेच वर्मा यांच्या बाबतीत कोणताही निर्णय घ्यावा असेही कोर्टाने सरकारला सुनावले आहे.

उच्चाधिकार समितीची एका आठवड्याच्या आत बैठक घेण्याचा आदेशही यात देण्यात आला आहे. सीबीआयच्या अंतरीम प्रमुखपदी एम नागेश्‍वरराव यांची नियुक्ती करण्याचा केंद्र सरकारचा आदेशही या निकालाद्वारे रद्दबातल ठरवण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)