अलोक वर्मांना सीबीआय संचालकपदावरून हटवले 

नवी दिल्ली (PTI) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय निवड समितीच्या बैठकीमध्ये आज सीबीआयचे संचालक अलोक वर्मा यांच्या पदाबाबत निर्णय घेण्यात आला आहे. सीबीआयचे संचालक अलोक वर्मा यांना त्यांच्या पदावरून हटविण्याचा निर्णय उच्चस्तरीय समितीने घेतला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

अलोक वर्मा हे १९७९ बॅचचे आयपीएस अधिकारी असून ते सीबीआयच्या आजपर्यंतच्या इतिहासातील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे पदावरून कमी झालेले पहिले अधिकारी ठरले आहेत. सीबीआय संचालक पदावरून हटविण्यात आल्यानंतर वर्मा यांची नेमणूक मानव हक्क आयोगावर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

अलोक वर्मा यांच्या विरोधामध्ये उच्चस्तरीय निवड समितीपुढे एकूण ८ आरोप मांडण्यात आले होते. उच्चस्तरीय निवड समितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींव्यतिरिक्त काँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खर्गे, आणि न्यायाधीश ए. के. सिक्रि (चीफ जस्टीस ऑफ इंडिया रंजन गोगाई यांच्याद्वारे नियुक्त) यांचा समावेश होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)