अखेर आलोक वर्मांचा राजीनामा ; रंगल्या उलट सुलट चर्चा !

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय निवड समितीच्या बैठकीमध्ये सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना त्यांच्या पदावरून हटविले. त्यानांतर वर्मा यांची  गुरुवारी रात्रीच अग्निशमन सेवा, नागरी संरक्षण दल आणि गृहरक्षक दलाच्या महासंचालकपदावर नियुक्ती करण्यात आली होती. मात्र काही तासांतच त्यांनी राजीनामा दिला आहे. वर्मा यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे उलट सुलट चर्चा रंगल्या आहेत.

आलोक वर्मा हे १९७९ बॅचचे आयपीएस अधिकारी असून ते सीबीआयच्या आजपर्यंतच्या इतिहासातील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे पदावरून कमी झालेले पहिले अधिकारी ठरले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आलोक वर्मा यांच्या विरोधामध्ये उच्चस्तरीय निवड समितीपुढे एकूण ८ आरोप मांडण्यात आले होते. उच्चस्तरीय निवड समितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींव्यतिरिक्त काँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खर्गे, आणि न्यायाधीश ए. के. सिक्रि (चीफ जस्टीस ऑफ इंडिया रंजन गोगाई यांच्याद्वारे नियुक्त) यांचा समावेश होता.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)