#MeToo “मद्यधुंद अवस्थेत अलोक नाथ माझ्या रूम मध्ये शिरले…” : संध्या मृदुल 

अभिनेत्री संध्या मृदुल हिने जेष्ठ अभिनेते व ‘संस्कारी बाबूजी’ म्हणून सर्वपरिचत असलेल्या अलोक नाथ यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप केले आहेत. संध्याने ट्विटरद्वारे सदर घटना शेयर केली असून यामध्ये तिने संपूर्ण घटनेची तपशीलवार माहिती दिली आहे.

संध्या लिहिते की एका चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान संध्या चित्रपटातील सर्व सहकलाकारांसोबत रात्रीच्या जेवणासाठी गेली होती. यावेळी अलोक नाथ हे देखील त्यांच्यासोबत आले होते. तिथे गेल्यानंतर अलोक नाथ यांनी मद्यपान करून आपल्यासोबत गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. सादर घटना इतर कलाकारांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मला लगेच तेथून हॉटेल रूमकडे रवाना केले.

-Ads-

रूम मध्ये आल्यानंतर मला दुसऱ्या दिवशी चित्रीकरणासाठी लवकर जायचे असल्याने माझा ड्रेस घेऊन ड्रेसवाला दादा आलं व तो ड्रेस देऊन गेला. लगेच प्रत्येकदा दार वाजले, मला वाटले ड्रेसवाला दादा परत आला असेल मात्र दारात मद्यधुंद अवस्थेत अलोक नाथ उभा होते. मी आतून दरवाजा लावण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी अलोक नाथ बाहेरून जोरात दरवाजा ढकलत आत आले व ‘तू फक्त माझी आहेस’ असा आरडा ओरडा करू लागले. मी कशीतरी त्यांना बाथरूम मध्ये बंद करून बाहेर पडले मात्र त्यांचे हे घाणेरडं वागणं पुढे देखील असच चालू राहील. मी त्यांच्या या बागणूकीमुळे इतकी हादरून गेली होती की मी माझ्या सोबतीला एक महिला हेअर ड्रेसर माझ्या रम मध्ये ठेऊन घेतली होती. अलोक नाथ कधी फोन करून त्रास देत तर कधी रात्री अपरात्री दरवाजा ठोठावत. या सर्व मानसिक त्रासामुळे माझी तब्येत बिघडली होती व मला दवाखान्यात दाखल करण्यात आलं होत. त्या वेळेस अलोक नाथ मला भेटायला आले व घडल्या प्रकाराबाबत माझी माफी मागितली.

कालच अलोक नाथ यांच्यावर विनिता नंदा यांनी बलात्काराचा गंभीर आरोप केला होता अशातच संध्याने देखील आरोप लावल्याने अलोक नाथ यांच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)