पालकमंत्र्यांकडून वारकऱ्यांना साहित्य वाटप 

कर्जत, जामखेडमधील दिंडीत ना. शिंदे यांनी सहभाग घेऊन साधला संवाद

जामखेड – कर्जत-जामखेड तालुक्‍यातून पंढरपूरकडे जाणाऱ्या दिंड्यामध्ये पालकमंत्री ना. राम शिंदे यांनी टेंभुर्णी (जि. सोलापूर) येथे दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झाले. टेंभुर्णीपासून काही किलोमीटर या दिंडी मार्गामध्ये वारकऱ्यांबरोबर पायी चालत व वारकऱ्यांशी संवाद साधत 15 ते 20 हजार वारकऱ्यांना विविध साहित्याचे वाटप करून त्यांनी हा मार्ग पूर्ण केला. यावेळी भागवत धर्माची पताका उंचावत टाळ, मृदुंगाचा गजर व हरिनामाचा जयघोष करीत ना. राम शिंदे सोहळ्यामध्ये सहभागी झाले.

दरवर्षीप्रमाणे कर्जत-जामखेड तालुक्‍यातून पंढरपूरकडे अधिक प्रमाणावर दिंड्या जातात. या दिंडीसोहळ्यामध्ये दोन्ही तालुक्‍यातील शेतकरी, वारकऱ्यांचा अधिक प्रमाणावर सहभाग असतो. या वारकऱ्यांशी सवांद साधण्यासाठी राज्याचे पणन व वस्त्रउदयोग राम शिंदे यांनी टेंभूर्णीजवळ दिंडीसोहळ्यमध्ये झाले.

यावेळी भाजप युवा नेते जयदत्त धस, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौतमी उतेकर, संचालक सागर सदाफुले, सुभाष जायभाय, महादेव डुचे, शिलाभाई शेख, भाजपचे तालुकाध्यक्ष आशोक खेडकर, जामखेड तालुकाध्यक्ष रवी सुरवसे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष ऍड. प्रवीण सानप, प्रकाश शिंदे, पंचायत समिती सभापती सुभाष आव्हाड शांतीलाल कोपनर, नगराध्यक्ष निखिल घायतडक नगरसेवक अमित चिंतामनी, अरणगावचे सरपंच लहु शिंदे, अजिनाथ हजारे, सोमनाथ राळेभात, सचिन मासाळ, उद्धव हुलगुंडे, गणेश पवळ यांच्यासह परिसरातील वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी पालकमंत्री राम शिंदे यांच्यावतीने दिंडीतील वारकऱ्यांना आरती संग्रह, ज्ञानदेव हरिपाठ वाटप, खाण्याचे साहित्य वाटप करून यांनी वारकऱ्यांबरोबर चालत जाऊन संवाद साधत टाळ आणि मृदुंगाचा ताल धरला आणि जय हरी विठ्ठलाचा जप केला.

पालकमंत्री ना. राम शिंदे म्हणाले, वारी म्हणजे परमेश्‍वराच्या चरणी नतमस्तक होण्याचा मार्ग आहे. वारीच्या माध्यमातून समाजाला समाजामध्ये जाऊन पाहणे व त्या समाजाकडून सकारात्मक गोष्टी शिकणे, वारकऱ्यांची सेवा म्हणजे पांडुरंगाची सेवा असा संदेश देणारी ही वारी असते. पंढरपूरच्या या आषाढी वारीला राज्य सरकारच्यावतीने सर्व सोयीसुविधा देण्यात आल्या आहेत, असेही यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)