तेलंगणात कॉंग्रेस आघाडीचे जागा वाटप जवळपास पुर्ण 

हैदराबाद – तेलंगणातील विधानसभा निवडणुकीच्या संबंधात कॉंग्रेस प्रणित आघाडीतील घटक पक्षांचे जागा वाटप जवळपास निश्‍चीत झाले आहे. या राज्यात कॉंग्रेस 90 जागा लढवणार असून तेलगु देसम, टीजेएस आणि कम्युनिस्ट पक्षांना 29 जागा सोडल्या जाणार आहेत.

119 जागांच्या या विधानसभेसाठी 7 डिसेंबरला मतदान होणार आहे. या 29 जागांपैकी 15 जागा तेलगु देसम पक्षाला, नऊ जागा तेलंगणा जन समितीला आणि पाच जागा कम्युनिस्ट पक्षाला दिल्या जाणार आहेत. या जागावाटपानुसार कॉंग्रेस पक्षाची पहिली यादी आणि पक्षाचा निवडणूक जाहीरनामा येत्या शुक्रवार पर्यंत जाहीर होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पक्षाच्या जाहींरनाम्याचा मसुदा तयार आहे अशी माहिती अ भा कॉंग्रेस समितीचे तेलंगणाचे निरीक्षक आर. सी. खुंटिया यांनी दिली. ते म्हणाले की आघाडीतील घटक पक्षांच्या वतीने एकच संयुक्त जाहीरनामा प्रकाशित करण्याचा विचार आहे असेही त्यांनी नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)