बिहारमध्ये भाजपा-जेडीयूत जागा वाटप 

नवी दिल्ली – पुढील वर्षी होणा-या लोकसभा निवडणूकीसाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. भाजपने आपल्या मित्र पक्षांसोबत बोलणी सुरू केली असून बिहारमध्ये भाजपा आणि जनता दल युनायटेडमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्‍चित झाला आहे. बिहारमध्ये दोन्ही पक्ष समान जागा वाटून घेतल्या आहेत.

फॉर्म्युला निश्‍चित झाल्यानंतर भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शुक्रवारी संयुक्तपणे पत्रकारपरिषद घेत निवडणूक एकत्र लढणार असल्याची घोषणा केली. पुढच्यावर्षी 2019मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष समान जागा वाटून घेतील. अन्य मित्र पक्षांनाही सन्मानजनक जागा मिळतील, असे भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कोण कुठल्या जागांवर आणि किती जागांवर लढणार आहे, यासंबंधी पुढच्या काही दिवसांत घोषणा केली जाईल. उपेंद्र कुशवाह आणि राम विलास पासवान आमच्यासोबतच राहतील, असे अमित शहा यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)