जयहिंद नागरी सहकारी पतसंस्थे तर्फे सभासदांना भेटवस्तू वाटप 

नारायणगाव – येथील जयहिंद नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने सभासदांना दीपावलनिमित्त भेटवस्तू वाटपाचा कार्यक्रम नुकताच पार पडल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष गुलाबराव नेहरकर आणि उपाध्यक्ष विजय गुंजाळ यांनी दिली. जुन्नर तालुका कार्यक्षेत्र असलेल्या या संस्थेचे 1870 सभासद असून, 20 कोटी 6 लाखांच्या ठेवी आहेत, तर 16 कोटी 51 लाखांचे कर्जवाटप आहे. मार्च 2018 अखेर संस्थेस 48 लाख 14 हजार रुपयांचा नफा झाला आहे.

दरवर्षी सभासदांना लाभांश आणि दीपावली भेटवस्तू देण्यात येते. याही वर्षी संस्थेतर्फे प्रत्येकी 1 किलो साखर, रवा, तेल, मैदा, बेसन पीठ, पोहे, मीठ अशा जीवनावश्‍यक वस्तू देण्यात आल्या, तसेच प्रत्येक सभासदाचा दोन लाख रुपयांचा अपघाती विमा, लॉकर सुविधा, वीज बिल भरणा, एनईएफटी, आरटीजीएस आणि बॅंकिंग सुविधा आदी योजना संस्था राबवत आहे. या प्रसंगी संस्थेचे संस्थापक शिवाजीराव खैरे, सचिव अरविंद लंबे, संचालक जितेंद्र गुंजाळ, देवेंद्र कोऱ्हाळे, बबन गुळवे, दयानंद काशिद, विक्रम काळे, डॉ. प्रदीप जोशी उपस्थित होते. सभासद नीलेश विटे, रवींद्र चव्हाण, अशोक फुलसुंदर, संजय काशिद, अमोल तांबे, नवनाथ भालेराव, मुख्य कार्यकारी अधिकारी मंगल कुऱ्हे आणि सेवकवृंद उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)