जामखेड: तालुक्यातील फक्राबाद येथे विश्व हिंदू परिषद यांचेमार्फत जनावरांना मोफत चारा वाटप विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन माणिक देशपांडे याच्या हस्ते करण्यात आला.
तालुक्यातील फक्राबाद व साकत या दोन ठिकाणी दुष्काळात होरपळत असलेल्या जनावरांसाठी मदत करण्याच्या उद्देशाने विश्व हिंदू परिषदेमार्फत मोफत चारा वाटप करण्याचे काम सुरु आहे. जनावरांसाठी चारा मोफत देण्याचे काम नाथ मस्कोबा सहकारी साखर कारखाना अध्यक्ष पांडुरंग राऊत हे स्वतः करीत आहेत.
यावेळी फक्राबाद परिसरातील ज्या लोकांची जनावरे चारा छावणीमध्ये नाही अशा जनावरांसाठी हा चारा उपलब्ध करून देण्याचे काम हे एक मोठे मोलाचे काम आहे हेच काम देशपांडे कुटुंबीय करत आहे चारा डेपो सुरू करून लोकांना आधार दिल्यामुळे लोकांकडून देशपांडे व पांडुरंग राऊत यांचेसह विश्व हिंदू परिषद आभार व्यक्त केले जात आहे. यावेळी सोसायटीचे चेअरमन माणिक देशपांडे, पोलीस पाटील योगेश जायभाय, अभिमान जायभाय, दत्तात्रय भुजबळ, आप्पा आढाव, मोहिनीराज आढाव, आत्माराम पोपळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.