तामिळनाडूमध्ये भाजप-अद्रमुकमध्ये आघाडी निश्‍चित

चेन्नई – आगामी लोकसभा निवडणूकीसाठी तामिळनाडूमध्ये भाजप आणि राज्यातील सत्तारुढ अद्रमुक पक्षामध्ये आज निवडणूक आघाडी झाली. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी अद्रमुकच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर चर्चा केली. त्यानंतर मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम आणि गोयल यांनी संयुक्‍त पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. या आघाडीनुसार तामिळनाडूत भाजप जागा लढवणार आहे, असे गोयल यांनी सांगितले. त्याबदल्यात तामिळनाडूतल्या विधानसभेच्या 21 जागांवर होणाऱ्या पोटनिवडणूकीत भाजप अद्रमुकला सहाय्य करणार आहे. ई पलानीस्वामी आणि ओ. पनीरसेल्वम यांच्या नेतृत्वाखाली तामिळनाडूमध्ये आणि राष्ट्रीय पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूका लढवण्यावर सहमती झाली आहे.

तामिळनाडूमधील 39 आणि पुद्दुचेरीतील 1 अशा लोकसभेच्या सर्वच्या सर्व 40 जागांवर भाजप- अद्रमुक आघाडी विजय मिळवेल, असा विश्‍वास पियुष गोयल यांनी व्यक्‍त केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अद्रमुकने “पीएमके’बरोबर देखील लोकसभेसाठी निवडणूक आघाडी निश्‍चित केली आहे. पीएमकेसाठी अद्रमुककडून 7 जागा सोडण्यात येणार आहेत, असे उपमुख्यमंत्री आणि अद्रमुकचे समन्वयक ओ. पनीरसेल्वम यांनी सांगितले. तामिळनाडूतील आणखी एक पक्ष “डीएमडीके’लाही “एनडीए’मध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी या पक्षाचे नेते विजयकांत यांच्याशी लवकरच चर्चा केली जाईल, असे पियुष गोयल यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)