युतीचा मेळावा, आघाडीची अजूनही पत्रकबाजीच

पुणे – युतीच्या प्रचाराचा नारळ जवळजवळ फुटलाच आहे, मात्र आघाडीमध्ये शुकशुकाट असून अजूनही कोण उमेदवार असावा याची पत्रकबाजीच सुरू असल्याचे दिसून येते. युतीच्या प्रचार आणि मेळाव्यांच्या ताराखा जाहीर झाल्या आहेत. पुण्यातील भाजप आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र बैठका घेऊन प्रचारालाही सुरूवात केली आहे. आघाडीमध्ये मात्र सध्या शुकशुकाटच असून, ज्येष्ठांचीच कोण उमेदवार असावा, याची पत्रकबाजी सुरू आहे. तर काही पदाधिकारी आणि निष्ठावान मात्र उमेदवार जाहीर होण्याची वाट पाहत असल्याचे चित्र आहे.

पुण्यातील युती आणि आघाडीचा उमेदवार कोण असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कार्यकर्ते आणि पदाधिकार्यांमध्ये वेगवेगळे आडाखे बांधण्यात येत आहेत. युतीचा उमेदवार जाहीर झाला नसला, तरी निवडणूक नियोजनाचा कामाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. युतीची मंडळी एकत्रित बैठका घेत आहेत. येत्या 18 मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे एकत्रित पुण्यात पहिल्यांदाच पश्‍चिम महाराष्ट्राचा मेळावा घेणार आहेत. यामध्ये पुणे, सोलापूर, बारामती,कोल्हापूर, सातारा, पिंपरी-चिंचवड आदी भागातील कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. याशिवाय बुथनिहाय याद्यांचे वापट झाले आहे. बुथप्रमुख, हजारी प्रमुखांनी प्रत्यक्ष मतदारसंघामध्ये कामाला सुरूवात केली आहे. त्यामुळे युतीने प्रचाराने आघाडी घेतली असेच म्हणावे लागले. उमेदवार कोण असणार यावर सध्या भाजपमध्ये कमी चर्चा होत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)