युत्या-आघाड्यांची बदलती समीकरणे

– राकेश माने

1990च्या दशकापासून आघाडीच्या राजकारणाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. आजही आघाडी, युती यांनी जोर धरला आहे. अनेक सहकारी पक्ष गमावलेला भाजप नव्या पक्षांच्या शोधात आपली संपूर्ण ताकद लावतो आहे. तर कॉंग्रेस पक्षातही तडजोडीचा हा क्रम सुरू आहेच. सध्याच्या राजकीय परिस्थितीत सर्वच पक्षांमध्ये जाऊन आलेले पक्ष नेहमीप्रमाणे आघाडीची एक बाजू पकडून सत्तेचा नफा-तोटा मोजताहेत. सत्तेची किल्ली सर्वात मोठ्या आघाडीकडे राहणार हे स्पष्ट असल्याने जागा कमी आल्यास भविष्यात अपक्ष किंवा स्वतंत्र राहणाऱ्या पक्षांना भुरळ पाडण्यासाठी काय करावे लागेल याची रणनीती आतापासूनच तयार केली जात आहे.

भारतीय जनता पक्षाचे पाच वर्षात 5 सहकारी सुटले तर जनता दल युनायटेडला हाताशी धरत नवे साथीदार शोधले.
सत्ताधारी भाजपचा विचार करायचा तर पक्षाने गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात पाच साथीदारांना गमावले. तेलुगू देशम पक्षापासून सुरू झालेला एनडीएला सोडचिठ्ठी देण्याचा सिलसिला स्वाभिमानी शेतकरी संघटना, हिंदुस्थान आवाम मोर्चा, रालोसपा असा प्रवास करत सध्यातरी आसाम गण परिषदेपर्यंत पोहोचला आहे. अर्थात पक्षाने दोन वर्षांपूर्वी जेडीयूला पुन्हा आपल्याकडे खेचण्यात यश मिळवले तर अगदी निवडणुकांपूर्वी भाजपने तमिळनाडूमध्ये अण्णाद्रमुक, पीएमके आणि डीएमडीकेच्या रूपात नवे साथीदारही मिळवले.

कॉंग्रेस पक्ष : जेडीएसपासून नव्या साथीदारांशी हातमिळवणीला सुरुवात निवडणुकीपूर्वी कॉंग्रेस यूपीएतील सदस्यांची संख्या वाढवण्यावर भर देतो आहे. जेडीएसला कर्नाटकात मुख्यमंत्रिपद सोपवल्यानंतर सिलसिला सुरूच आहे. पक्षाने जुन्या सहकारी पक्षांना एनसीपी, डीएमके यांच्याबरोबर जागांचे वाटप करून घेतले आहे. उत्तर प्रदेशात सपा- बसपा आघाडीत सामील झाली नाही पण लहान लहान पक्ष जसे महान दल, पीस पार्टी कॉंग्रेसने आपल्यात सामील करून घेतले. पश्‍चिम बंगालमध्ये टीएमसी, बिहारमध्ये राजद, झारखंडमध्ये झामुमो, राजदबरोबर आघाडी करण्याच्या चर्चा अंतिम टप्प्यात आहेत.

उड्या मारणारे पक्ष : भारतीय राजकारणात लोक जनशक्‍ती पक्षाचे प्रमुख रामविलास पासवान आणि राष्ट्रीय लोकदलाचे प्रमुख अजितसिंह यांना हवामानशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जाते. पासवानांचा विचार करता गेल्या तीन दशकांपासून पासवान जवळपास सतत इकडून तिकडे जात सत्तेमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळेच त्यांना हवामान तज्ज्ञ असे नाव दिले जाते. अर्थात, असे करणारे ते एकटे नाहीत. देशातील एक डझनाहून अधिक पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि संयुक्‍त पुरोगामी आघाडी या आघाडीच्या दोन विरुद्ध ध्रुवांमध्ये विविध वेळी सामील झालेले आहेत. या पक्षांची काही पक्की विचारधारा नाहीये तर त्यांना कोणत्याही परिस्थितीत सत्तेत सामील व्हायचे आहे. टीडीपी, अण्णाद्रमुक, द्रमुक, पीएमके, डीएमडीके, आरपीआय, लोक जनशक्‍ती पक्ष, रालोद, जदयू, हम, अरुणाचल कॉंग्रेस, टीएमसीसारखे पक्ष वेळ आणि परिस्थितीनुसार आपले पक्ष बदलत राहतात.

प्लॅन बी तयार : निवडणुकीत गठबंधनाला बहुमत मिळाले नाही तर काय यासाठी राष्ट्रीय पक्षांकडे प्लॅन बी तयार आहे. त्याअंतर्गत एनडीए आणि यूपीने तटस्थ पक्षांसाठी रणनीती आखली आहे. भाजपची रणनीती पाहिली तर गरज पडल्यास बीजेडी, टीआरएस आणि वायएसआर कॉंग्रेसला हाताशी धरण्याचा त्यांचा मनोदय आहे. त्यामुळेच भाजप सहकारी पक्षांबरोबर नरमाईचे धोरण वापरत आहे. दुसरीकडे कॉंग्रेसचे लक्ष लागले आहे ते आप, इनेलो, सपा-बसपावर.

दूर का गेले पक्ष?
टीडीपी : आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा न देणे हे कारण घडले. सरकारला भीती होती की टीडीपीची ही मागणी मान्य केल्यास बिहारसह अनेक राज्ये अशाच प्रकारची मागणी करतील.

स्वाभिमानी शेतकरी संघटना : शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर घेतली फारकत

रालोसपा : जेडीयूचे प्रमुख नितीशकुमार आणि रालोसपाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांच्यादरम्यान कायमच छत्तीस आकडा आहे. जेडीयू जेव्हा पुन्हा भाजपच्या जवळ आली तेव्हा कुशवाह यांनी उघड विरोध दर्शवला आणि रालोसपा बाहेर पडला.

हिंदुस्तान आवाम मोर्चा : बिहारमधील निवडणुकांमध्ये तोंडघशी पडल्यानंतर भाजपला जीतनराम मांझी यांचा काहीही उपयोग नाही असे वाटू लागले.

आसाम गण परिषद : नागरिकता संशोधन कायद्यामुळे वेगळी चूल.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)