आघाड्यांची सोयरिक

– अपर्णा देवकर 

जवळपास 25 वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर 2014 मध्ये देशात सत्तास्थापनेसाठी एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले. 1989 च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर जवळपास सलग काही वर्षे केंद्रातील सत्तेत आघाड्यांचीच सरकारे येत राहिली. त्याकाळात केंद्रात आणि राज्यांत दोन्हीही स्तरांवर कॉंग्रेसचा प्रभाव होता.

1989 नंतर मात्र कॉंग्रेसचा हा प्रभाव ओसरत गेला आणि कडबोळ्यांची सरकारे केंद्रात आली. यातील ज्या सरकारांनी समान विचारधारेच्या पक्षांसोबत किमान समान कार्यक्रमांतर्गत काम केले त्यांच्या कार्यकाळात विकासाचा फायदा लोकांपर्यंत पोहोचला. पण अशी उदाहरणे मोजकीच होती. त्यामुळेच आघाड्यांची सरकारे विकासाला मारक असतात असे मानले गेले. ते अनेकार्थांनी खरेही आहे. विशेष म्हणजे बदलत्या काळात केंद्रातच नव्हे तर राज्या-राज्यांमध्येही आघाड्यांची सरकारे सत्तेत येत गेली. एका पाहणीनुसार 1969 ते 1999 या काळात अशा प्रकारची 43 आघाड्यांची सरकारे देशात आकाराला आली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)