#क्रीडांगण: कोहलीच्या खांद्यावर संघाचे ओझे! (भाग २)

भारतीय क्रिकेट संघाच्या प्रत्येक परदेश दौऱ्यातील कसोटी मालिका ही अपयशानेच सुरू होते. ही परंपरा इंग्लंड दौऱ्यातही कायम राहिली. पाच कसोटी सामन्यांच्या या मालिकेत पहिल्याच सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने उर्वरित मालिकेचा निकाल काय असेल याची कल्पना आपण नक्कीच करू शकतो. कर्णधार विराट कोहली वगळता कोणाच्याच धावा होत नाहीत आणि नेहमीप्रमाणे कोहलीच्या खांद्यावर संघाचे ओझे, अशी परिस्थिती निर्माण होते. 
आता या पहिल्या कसोटीच्या पराभवाचे खापर राहुलवर फोडले जाईल त्याचवेळी पुजारा किंवा रोहित शर्मा यांना अंतिम 11 खेळाडूत स्थान देऊन दुसऱ्या कसोटीला संघ सफा होईल, पण ही देखील तात्पुरती मलमपट्टीच ठरणार आहे. या दौऱ्यावपूर्वी भारतीय संघाने टी-20 सामन्यांची मालिका जिंकली मात्र, एकदिवसीय सामन्यांची मालिका गमावली. आता कसोटी मालिका सुरू झाल्यानंतरही कोहली वगळता सगळेच फलंदाज आपण कसोटी नव्हे तर टी-20च खेळत आहोत इतक्‍या बेजबाबदारपणे आपल्या विकेट गमावत आहेत. अनेक जाणकारांच्या मते आपण या मलिकेपूर्वी जितका सराव करायला हवा होता तेवढा गांभीर्याने केला नाही आणि त्याचाच फटका पहिल्या कसोटीत आपल्याला बसला. दुसऱ्या कसोटीत तरी आपल्या चुका सुधारून सर्व खेळाडू जबाबदारी घेतील आणि परदेशात कागदी वाघ ठरतात हा शिक्का पुसून काढतील अशी अपेक्षा आहे.
गोलंदाजांनी कमावले, फलंदाजांनी गमावले 
या कसोटीत भारतीय गोलंदाजी कधी नव्हे इतकी यशस्वी ठरली. इशांत शर्मा, रविचंद्रन अश्‍विन, महमद शमी यांनी यजमान संघाला पहिल्या डावात 300 धावांच्या आत रोखले, तर दुसऱ्या डावात 200 धावांच्या आत रोखले. त्यांनी आपली जबाबदारी अत्यंत चोखपणे पार पाडली. मात्र, या त्यांच्या कामगिरीवर कर्णधार कोहली वगळता बाकी सर्व फलंदाजांनी पाणी फेरले. भारताने पहिल्या डावात इंग्लंडविरुद्ध आघाडी घेण्याची सुवर्णसंधी गमावली. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात एकवेळ 7 बाद 97 अशी स्थिती झाली होती. मात्र, तळातील फलंदाजांनी त्यात आणखी जवळपास 90-95 धावांची भर घालून भारतासमोर छोटे पण काहीसे कठीण आव्हान उभे केले.
तळातील तीन फलंदाजांना लवकर बाद करण्यात गोलंदाज नव्हे, तर क्षेत्ररक्षक अपयशी ठरले. शिखर धवनने पाठोपाठ दोन झेल सोडून इंग्लंडच्या फलंदाजांना जणू धावा करण्याची संधीच उपलब्ध करून दिली. यानंतर भारताला विजयासाठी केवळ 196 धावा करायच्या होत्या. मात्र, त्या देखील कठीण बनत गेल्या. शिखर धवन, मुरली विजय, के. एल. राहुल आणि अजिंक्‍य रहाणे हे फलंदाज एकापाठोपाठ बाद होत गेले आणि कर्णधार कोहलीवरचे दडपण वाढले त्यातच अश्‍विन, पंड्या आणि दिनेश कार्तिकही अपयशी ठरल्याने कोहलीचाही आत्मविश्‍वास डगमगला. तो बाद झाला आणि सामना जिंकण्याच्या उरल्या सुरल्या अपेक्षाही संपल्या या सामन्यात गोलंदाजांनी जे कमावले ते फलंदाजांनी गमावले.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)