सर्व निवडणुका एकदाच हव्या – फडणवीस 

स्थानिक स्वराज्य संस्थांचाही त्यात समावेश होण्याची गरज 

मुंबई  – एक देश, एक निवडणूक या संकल्पनेवर गंभीरपणे विचार करण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीही या धोरणाचा अवलंब व्हावा असे, फडणवीस यांना वाटते.इतकेच नव्हे तर लोकसभा, विधानसभा निवडणुकांबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही एकाच वेळी व्हायला हव्यात, असे त्यांनी एका कार्यक्रमात सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

फडणवीस म्हणाले, निवडणुकांसाठी खर्च होणारा पैसा आणि मेहनत यांमुळे आपल्यासारख्या राजकीय लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. प्रत्येक निवडणुकीसाठी नवी रणनीती आखावी लागते कारण प्रत्येक निवडणुकीचा परिणाम दुसऱ्या निवडणुकीवर पडत असतो. यामुळे विविध पर्यायातून भविष्यासाठी योग्य पर्याय निवडण्याच्या प्रक्रियेवरही याचा प्रभाव पडतो.

दिल्लीत भाजपा कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना राज्यातील विधानसभा निवडणुकीवर भाष्य करताना फडणवीस म्हणाले, ही निवडणूक भाजपाला शिवसेनेसोबत लढवणे गरजेचे आहे. भाजपाचे संगठन सचिव रामलाल यांना त्यांनी याची माहिती दिली. त्यांच्या या विधानानंतर शिवसेनेची नाराजी दूर करण्यासाठी भाजपा पुढे येऊन प्रयत्न करेल असे वाटते. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी देखील येथे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चार चास चर्चा केली.

 

एकाच भागात पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या संस्थांसाठी निवडणुका घेतल्यास जनतेचा व सरकारचाही वेळ आणि पैसा वाया जातो. हे टाळण्यासाठी सर्व निवडणूक एकाच वेळी घेणे तर्कशुद्ध ठरेल. 
– देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)