राज्यभरात 2 नोव्हेंबरला अखिल भारतीय किसानची निदर्शने 

कोल्हापूर – राज्यात दुष्काळाचे सावट असतानाच आता अखिल भारतीय किसान सभा सरकार विरोधात पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. 2 नोव्हेंबरला किसान सभा राज्यभरात निदर्शने करणार आहे. हे आंदोलन प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात येणार आहे, अशी माहिती किसान सभेचे डॉ. अजित नवले यांनी दिली.

नवले म्हणाले, उसाला किमान 3500 रुपये दर द्यावा, शेतकऱ्यांना जमिनीवरून उठवणारी बुलेट ट्रेन रद्द करावी, दुष्काळ जाहीर करावा अशा मागण्या घेऊन किसान सभा हे आंदोलन करणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये 15 नोव्हेंबरला मुंबईत आंदोलन करण्यात येणार आहे. मुंबईमध्ये राज्यव्यापी शेतकरी परिषदेचे यावेळी आयोजन करण्यात येणार आहे. परिषदेला भाजपसोडून सर्वच प्रमुख राजकीय पक्षांना निमंत्रण देण्यात येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तिसरे आंदोलन 28 ते 30 नोव्हेंबर दरम्यान राजधानी नवी दिल्लीमध्ये पायी किसान मोर्चाद्वारे करण्यात येणार आहे. या मार्चमध्ये देशभरातल्या 180 शेतकरी संघटना सहभागी होणार असल्याचे नवले यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)