देशभरातील सर्व सरकारी बँका येत्या रविवारीही सुरु  

नवी दिल्ली : देशभरातील सर्व सरकारी बँक रविवारी खुल्या राहणार आहेत. यंदाच्या आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस (३१ मार्च) हा रविवारी येत असल्याने या दिवशी बँका खुल्या राहणार आहेत. यासंदर्भात भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना सूचना दिल्या आहेत.

रिझर्व्ह बँकेने एक परिपत्रकही जारी करत सरकारी बँकांच्या सर्व शाखा ३० मार्च २०१९ रोजी रात्री ८ वाजेपर्यंत आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी ३१ मार्च २०१९ रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत खुल्या राहणार आहेत.

https://twitter.com/RBI/status/1110574612713074688

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)