नवी दिल्ली- अरुणाचल प्रदेश येथे साधारण आठ दिवसांपुर्वी अचानकपणे गायब झालेले भारतीय वायुसेनेचे एएन-32 विमानाचा अखेर गुरुवारी संपूर्ण सांगाडा बचाव कार्याच्या हाती लागला आहे. मात्र, या विमानातील सर्व 13 जणांचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. भारतीय वायुसेनेने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून या घटनेची माहिती दिली आहे.
#Update on #An32 crash: Eight members of the rescue team have reached the crash site today morning. IAF is sad to inform that there are no survivors from the crash of An32.
— Indian Air Force (@IAF_MCC) June 13, 2019
एएन-32 विमानाला बेपत्ता होऊन साधारण 8 दिवस झाले होते. सोमवार दिनांक 3 जून रोजी दुपारी 12.27 वाजता आसाममधल्या जोरहाट विमानतळावरून भारतीय वायुदलाच्या एएन-32 या मालवाहू विमानाने झेप घेतली होती. मात्र, दुपारी 1 वाजता विमानाचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटला आणि तेव्हापासून या विमानाचा आणि त्यात असलेल्या हवाई दलाच्या 13 कर्मचाऱ्यांचा कुणालाच पत्ता नव्हता.
IAF: Following air-warriors lost their lives in #AN32 aircraft crash: Warrant Officer KK Mishra, Sergeant Anoop Kumar, Corporal Sherin, Lead Aircraft Man SK Singh, Lead Aircraft Man Pankaj, Non-combatant Employee Putali & Non-combatant Employee Rajesh Kumar. (2/2) https://t.co/FDDgLZ1lJW
— ANI (@ANI) June 13, 2019
एएन-32 विमानात प्राण गमावलेले 13 जण-
– विंग कमांडर जी एम चार्ल्स
– स्क्वाड्रन लीडर एच विनोद
– फ्लाइट लेफ्टनंट आर थापा
– फ्लाइट लेफ्टनंट ए तंवर
– फ्लाइट लेफ्टनंट एस मोहंती
– फ्लाइट लेफ्टनंट एम के गर्ग
– वॉरंट ऑफिसर केके मिश्रा
– सार्जेंट अनूप कुमार
– कोरपोरल शेरीन
– लीड एअरक्राफ्ट मॅन एस के सिंह
– लीड एअरक्राफ्ट मॅन पंकज
– कर्मचारी पुताली
– राजेश कुमार