लग्नानंतरही काम करण्याची आलियाची इच्छा

आलिया भट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाच्या अपडेटची सध्या खूप चर्चा सुरू झाली आहे. कपूर खानदानाने आलियाला कधीच बहुरानीचा किताब देऊन टाकला आहे. रणबीर आणि आलियामध्ये अफेअर रंगत नसेल, एवढी त्यांच्या लग्नाची चर्चा रंगते आहे. रणबीरकडून या विषयावर फारसे बोलले जात नाही. पण आलिया बेबी मात्र खूपच खूश असते. सोशल मीडियावर ती आपल्या भावी योजनांचे वेगवेगळे प्लॅन अपलोड करत असते. तिच्या विवाहानंतरच्या अनेक गोष्टींचे प्लॅन तयार आहेत.

गेल्याच आठवड्यात तिने सोशल मीडियावरच्या आपल्या फॅन्सशी मनमोकळा संवाद साधला. कित्येक फॅन्सच्या प्रश्नांची उत्तरेही तिने दिली. इन्स्टाग्रामवर “आस्क मी एव्हरीथिंग’ नावाचे एक सेशनच तिने सुरू केले होते. त्याला फॅन्स फॉलोअरनी प्रचंड प्रतिसाद दिला आणि तिच्यावर प्रश्नांचा अक्षरशः भडिमार झाला. या सगळ्या प्रश्नांना अलियाने आपल्या हजरजबाबी स्वभावाप्रमाणे उत्तरे दिली. तिला एका फॅनने “लग्न झाल्यावरही काम करणार का?’ असे विचारले. तेंव्हा “सोशल मीडियावरचे स्टेटस बदलण्याशिवाय अन्य कोणत्याही बाबतीत मी काहीही बदल करण्याची आवश्यकता नाही.’ असे उत्तर आलियाने दिले. लग्नानंतरही अॅॅक्टिंग सुरूच ठेवणार असल्याचे अशाप्रकारे तिने स्पष्ट केले.

-Ads-

आलिया सध्या अयान मुखर्जीच्या “ब्रह्मास्त्र’च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. याशिवाय “कलंक’ आणि “बत्ती गुल, मीटर चालू’ सारखे काही सिनेमे तिच्याकडे आहेत. महिन्याभरापूर्वीच आलियाने मुंबईत आलिशान अपार्टमेंटमध्ये एक फ्लॅट खरेदी केला आहे. त्याचे डिझाईन आणि डेकोरेशनही तिने आपल्या स्वतःच्या देखरेखीखाली करून घेतले आहे. हा तिच्या स्वप्नांचा इमला रणबीरबरोबर फार बहरू शकणार नाही, असे कपूर खानदानाच्या निकटवर्तीयाने म्हटले आहे.

आलिया फिल्म इंडस्ट्रीमध्ये आली. त्यानंतर काही वर्षातच सिद्धार्थ मल्होत्राबरोबर तिचे अफेअर जुळले. काही दिवसातच त्याला पूर्णविराम मिळाला. त्यानंतर रणबीर कपूरबरोबर तिचे सूत जुळले आहे. रणबीरने यापूर्वी अनेक जणींना दुखावले आहे. त्याने दीपिका आणि कतरिनालाही दुखावले आहे. त्यामुळे तो आलियालाही दुखावू शकतो, असे या फॅमिली फ्रेंडला वाटते. जर तसे झाले, तर आपण किमान फिल्म इंडस्ट्रीबरोबरचे कनेक्शन तोडता कामा नये, असा व्यवहारी विचार करूनच लग्नानंतरही काम करत राहण्याचे आलियाने ठरवलेले असावे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)