आलियाला पुरस्कार, रणबीरला आनंदाश्रू

यंदाच्या फिल्म फेअर पुरस्कार वितरणाच्या समारंभात “बेस्ट ऍक्‍ट्रेस’चा फिल्मफेअर अवॉर्ड आलिया भट्ट हिला चित्रपट ‘राझी’ साठी मिळाला आहे. अवॉर्ड विनिंग स्पीच देत असतानाच तिने अचानक रणबीर कपूरवर आपले प्रेम व्यक्‍त केले. आलियाने रणबीरला ‘आय लव्ह यू’ म्हणताच तो इमोशनल झाला. क्षणार्धात त्याचे डोळे पाणावले.

उल्लेखनीय बाब म्हणजे शनिवारी रात्री उशिरा जियो गार्डनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या पुरस्कार सोहळ्यात रणबीर कपूरने ‘संजू’ चित्रपटासाठी बेस्ट ऍक्‍टरचा पुरस्कार मिळवला. अवॉर्ड स्वीकारण्यापूर्वी रणबीर आणि आलियाने एकमेकांना जवळ घेतले. यावेळी प्रेक्षकांना टाळ्या वाजवल्या. सोशल मीडियावर दोघांचा हा रोमॅन्टिक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

रणबीर आणि आलिया हे ऑफस्क्रीन जसे लोकप्रिय झाले आहेत. तसेच त्यांची जोडी ऑनस्क्रीनही हीट होणार आहे. “ब्रम्हास्त्र’मध्ये ही जोडी स्क्रीनवर दिसणार आहेच. नुकतेच कुंभमेळ्याच्या निमित्ताने 150 ड्रोनच्या सहाय्याने केलेल्या “ब्रम्हास्त्र’च्या लोगोचे अनावरण करण्यात आले होते.

सध्या सोशल मीडियावर सलमान आणि बेबी आलिया एक फोटो व्हायरल झाला आहे. ही आलिया आहे, हे ओळखूच येत नाही आहे. फोटोत सलमानसोबत छोटी आलिया बसलेली दिसत आहे. तसेच या फोटोसोबत कॅप्शन ही लिहिली आहे की, कोणाला माहित होते की, आम्ही दोघेजण पुढे एकत्र चित्रपटात भूमिका साकारणार आहोत?

संजय लीला भन्साळी यांच्या आगामी ‘इंशाअल्लाह’ या चित्रपटात सलमान खानसोबत आलिया भट्टची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. त्याची आठवण या फोटोच्या निमित्ताने करून दिली गेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)