आलिया – रणबीर कधी लग्न करणार?

रणबीर आणि आलिया भट लग्न करणार, असे गेल्या वर्षभरापासून ऐकतो आहोत, पण त्यांच्या लग्नाचा मुहूर्तच मिळत नाही आहे. अशातच या दोघांच्या जोरदार वादावादीचा एक व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला होता. मात्र, त्यावर दोघांनी सावरासावरीची उत्तरे दिली होती. पण मग हे दोघे लग्नाचा विषय टाळत का आहेत.

आलियाने याचे उत्तर दिले आहे. रणबीरबरोबरची रिलेशनशीप ती एन्जॉय करते आहे. त्यामुळे लगेच लग्नाच्या बंधनात अडकण्याची तिला अजिबात घाई नाही. रणबीरबरोबरच्या रिलेशनशीपचा बॉन्ड घट्ट करण्यावर आपला भर अधिक आहे. लग्न झाल्यावर संसार तर आयुष्यभर करायचाच आहे. पब्लिकला याच मुद्द्यावर चर्चा करण्यात का इंटरेस्ट आहे, याचा प्रश्‍नही तिला पडला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या सगळ्या मुद्द्यावर रणबीरकडून मात्र कोणतेच स्पष्टीकरण कधीही दिले गेलेले नाही. त्याने स्वतःला याबाबत अगदी “ब्लॉक’ करून टाकले आहे. विशेषतः ऋषी कपूर यांच्या आजारपणाच्या निमित्ताने रणबीरने लग्नाचा विषयच बाजूला ठेवला आहे.

नववर्षाची पार्टी आणि व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने या दोघांना पुन्हा एकमेकांशी गुफ्तगू करताना बघितले गेले आहे. त्यामुळे त्यांच्यातील केमिस्ट्री बिघडली आहे, असे तर काही म्हणता येणार नाही. त्यानंतर कपूर आणि भट कुटुंबामधील कोणत्याही प्रसंगी हे दोघे एकत्र दिसले होते. दिवाळी असो वा नुकताच झालेला रणधीर कपूर यांचा वाढदिवस, हे दोघे पुन्हा एकत्र दिसले आहेत. सोनम कपूरच्या लग्नापासून त्यांच्या अफेअरची खुली चर्चा सुरू आहे. मागून येऊन दीपिका आणि प्रियांका यांची लग्ने झालीसुद्धा. मात्र या दोघांच्या लग्नाचा विषय पुढे का सरकत नाही आहे, हा खराच एक प्रश्‍न आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)