बॉलीवूडमध्ये क्यूट ऍण्ड स्टायलिश अभिनेत्री म्हणून आलिया भट्ट ओळखली जाते. तिच्या अभिनयाने तर चाहत्यांच्या मनावर एक जादूच केलेली आहे. तिच्या प्रत्येक गोष्टींवर चाहत्यांची नजर असते. त्यामुळे आलिया सतत आपले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करत असते. त्यात आलियाने नुकताच बिना मेकअपचा फोटो शेअर केला आहे. जो सध्या खुपच व्हायरल होत आहे.
आलियाच्या या फोटोला आतापर्यत तब्बल 9 लाख चाहत्यांनी लाईक केले आहे. या फोटोत आलिया खूपच क्यूट अशी दिसत आहे. आलियाने व्हाईट कलरचा बाथरोब घातला असून आलियाने “मुड’ असे फोटो कॅप्शन लिहिले आहे.
यापूर्वीही आलिया अनेकवेळा बिना मेकअप दिसली होती. पण यावेळी व्हाईट बाथरोबमध्ये ती खूपच सुंदर अशी दिसत आहे. त्यामुळेच तिला लाखो लाइक्स आणि कॉमेंट्स मिळत आहेत. या फोटोवर चाहत्यांनी अनेक हार्ट इमोजी पोस्ट करत तिची स्तुती केली आहे.
दरम्यान, वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास आलिया सध्या “ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या कामात व्यस्त आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अमिताभ बच्चन, रणबीर कपूर आणि मौनी रॉय झळकणार आहेत.