आलिया आणि रणबीरचा विवाह पुढील वर्षी

बॉलिवूडमध्ये सध्या “वेडिंग सीझन’ सुरू झाला आहे. पुढील वर्षापर्यंत हा सीझन सुरू राहणार अशी चिन्हे आहेत. रणबीर कपूर आणि आलिया भट या जोडीने आपल्या रिलेशनशीपला थोडे एक्‍सटेन्शन द्यायचे ठरवले आहे. आता त्यांनी लगेच लग्न करण्याऐवजी थोडे दिवस थांबायचे ठरवले आहे. हे दोघेजण पुढील वर्षी विवाह करणार असल्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.

आलिया आणि रणबीर दोघेही गेल्या 1-2 वर्षांपासून डेटिंग करत आहेत. दोघांच्याही कुटुंबीयांनीही या जोडीबद्दल समाधान व्यक्‍त केले आहे आणि या रिलेशनशीपला मान्यताही दिली आहे. रणबीरचे पप्पा ऋषी कपूर सध्या न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहेत. ऋषी कपूर बरे होईपर्यंत विवाहाच्या मुद्दयावर आताच काहीही ठरवायला नको, असे दोन्ही घरच्यांचे म्हणणे आहे. भट कुटुंबापेक्षा कपूर कुटुंबातच या नात्याबाबत खूप उत्साह आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लग्न करून कपूर खानदानात आलेल्या कोणाही महिलेने लग्नानंतर सिनेमात काम केलेले नाही. मात्र याला आलिया अपवाद असण्याची शक्‍यता आहे. रणबीरशी विवाह झाल्यानंतरही ती सिनेमात काम करतच राहण्याची शक्‍यता अधिक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)