एअर स्ट्राइकनंतर देशभरात अलर्ट; सीमेवर गोळीबार सुरू

नवी दिल्ली – हवाई दलाने एअर स्ट्राईक केल्यानंतर देशभरात अलर्ट जारी करण्यात आला आहे. पंजाबमधील पठाणकोट, बनासकांठा, भोपाळ, धरमशाला हवाई तळांवरही अलर्ट जारी करण्यात आला असून आवश्‍यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पाकिस्तानकडून सुरू असलेल्या गोळीबाराला सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. जम्मूच्या कनाचक आणि सांबा सेक्‍टरमध्ये दोन्ही बाजूंकडून मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरू आहे. पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतीय दलांनी दिलेल्या प्रत्युत्तरात एक पाकिस्तानी रेंजर ठार झाला आहे. भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत सकाळी 6 वाजता जम्मू कश्‍मिरच्या राजौरी आणि पूंछ भागात गोळीबाराला सुरुवात केली. सकाळपासून दोन्ही बाजूंकडून थोड्या थोड्या वेळाने गोळीबार सुरू आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पाकिस्तानकडून होत असलेल्या गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर लष्कर, हवाई दल आणि नौदलाला सर्तक राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पाकिस्तानच्या कोणत्याही कुरघोडींना प्रत्युत्तर देण्यास सज्ज असल्याचे तिन्ही दलांकडून सांगण्यात आले. देशातील हवाई तळांवर कोणत्याही कारवाईसाठी हवाई दलाला सज्ज ठेवण्यात आले आहे. अरबी समुद्रात नौदलही सज्ज असून जवान परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. पोरबंदरसह इतर समुद्रकिनाऱ्यांवर योग्य ती सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)