नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

संग्रहित चित्र

नगर – उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये 16 ते 18 ऑगस्ट कालावधीत अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत सरासरी 213.81 मी. मी. (42.99 टक्के) पाऊस झालेला आहे. जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीत नाशिक जिल्ह्यातील नांदूरमधमेश्‍वर बंधाऱ्यातून 3228 क्‍युसेस विसर्ग सोडण्यात आलेला आहे. तसेच भीमा नदीस दौंड पूल येथे 17820 क्‍युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

अकोले तालुक्‍यातील भंडारदरा धरणातून प्रवरा नदीत प्रवरा नदीत 2210 क्‍युसेस पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. निळवंडे धरणातून प्रवरा नदीपात्रात 1400 पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाल्यास धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन, पर्यायाने नदीपात्रातील विसर्गात देखील वाढ होणार आहे. आगामी काळात अहमदनगर तसेच नाशिक व पुणे जिल्ह्यात पावासामुळे धरणात सोडण्यात आलेल्या विसर्गात वाढ झाल्यास जिल्ह्यातून वाहणाऱ्या प्रवरा, गोदावरी, भीमा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्‍यता आहे.

-Ads-

सूचनांचे पालन करण्याचे आवाहन

जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील तमाम नागरिकांना आवाहन करण्यात येते की, स्थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्या सूचनांचे पालन करावे, सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना तातडीने सुरक्षितस्थळी स्थलांतर करावेत, नदी, अथवा ओढे नाल्यांवरील पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नये, पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये, धोकादायक व मोडकळीस आलेल्या इमारतींचा आश्रय घेऊ नये.

1077 टोल फ्री

अचानक नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यास जिवीतास धोका उद्‌भवू शकतो. आपत्कालीन परीस्थितीत पोलीस अथवा स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा, तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय येथील 1077 टोल फ्री नंबरवर संपर्क करण्याचे आहवान जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांनी केले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)